Wednesday 6 May 2015


ऑगस्ट २००५      
       चांदण्या
जर ह्या चांदण्या नसल्या असत्या तर .......

जर ह्या चांदण्या नसल्या असत्या तर,
किती भकास वाटले असते हे आकाश.
ह्या चांदण्याविना ,
हि पृथ्वीच झाली असती निराश.

किती जपून चालतात ह्या चांदण्या सावकाश,
जसे काही ओढतात ह्या, प्रत्येक मनाच्या भावनेची कास.
कधी वाटते कि ह्याच जाणतात,
 माझा प्रत्येक गुंतलेला श्वास.

मी राहीन राहीन,
पण ह्या चांदण्या देतील माझी साक्ष.
नाहीतर मी हि होईन असाच एक तर खास,
ज्याला नाही कोणता अंत अन, नाही कोणता त्रास ,

बघेन हि सुंदर सृष्टी,
तसेच बघेन तिचा तो विकृत ऱ्हास.
पण करू शकणार नाही काही,
शेवटी मी त्या निर्मिकाचाच दास.

तर असो वा मानव निर्जीव असो वा सजीव,
सर्वांच्याच गळ्यात आहे मरणाचा फास.
ह्या समीकरणाला नसेल कुणाचीच साक्ष,
कारण शेवटी ह्या ब्रम्हांडचाही आहे अटळ विनाश.
ह्या ब्रम्हांडचाही आहे अटळ विनाश .








Stars

August 2005
Stars
If these stars would not .......

If this would have no stars,
How is this supposed funereal sky .
Without the stars,
This would have been disappointed cry .

How these stars could walk slowly ,
As like pulling each thread of each mind .
Sometimes I feel that,
My each lost, as they find.
I will not dwell ,
But these stars will be my witness .
Otherwise, I will be like one of them,
Who will be eternal , and will be deathless .

Inquire this beautiful nature ,
And inquire of her malformed undermine .
But I can’t do anything ,
Finally, I will be hopeless determine.

But be it human or inanimate or animate ,
Everybody has his death traps.
This equation is not themselves witness,
Destruction is certain even for every lapse .....
Destruction is certain even for every lapse .....


1 comment:

  1. हि कविता मी दहावीच्या सुट्टीमध्ये लिहिली होती, गोष्टी लिहित असताना एका मित्राने आठवण करून दिली, कि मराठीच्या कविताही येऊ देत, तर आता जशा आठवतील तशा टाकत जाईन, आणि हो नवीन पण बनवेन.नक्की वाचा

    ReplyDelete